आठ दिवसाला भेट (अष्टाक्षरी रचना प्रकार)
आठ दिवसाला भेट (अष्टाक्षरी रचना)
कशी अचानक होते
आठ दिवसाला भेट
छान उपक्रम आहे
येती अधिकारी थेट...!!
शाळाभेट घेता घेता
सुधारली गुणवत्ता
झाल्या बोलक्या शाळा
आणि प्रत्येक इयत्ता....!!
सप्ताहाचा उपक्रम
वारांनुसारच चाले
१००% गुणवत्ता हवी
मुख्य कार्यकारी बोले....!!
वाघमारे जरी नांव
ध्यास घेतला चांगला
नेते आणि पुढा-यांचा
जीव मुठीत टांगला....!!
पायाभूत साक्षरता
आणि हवे संख्याज्ञान
गुरूजी घडवी पिढी
जगी आदराचे स्थान....!!
ऑनलाईन कामाने
जीव मेताकुटी आला
शिकवू द्या लेकरांना
बोले माणूस तो भला...!!
काय सांगावी कुणाला
गळपेची शिक्षकांची
कामे हजार आणली
रोज ऑनलाईनची....!!
गुरूविन कोण सांगा
दाखवेल कशी वाट?
गुरू चांगला भेटला
त्यांच्या आयुष्याचा थाट...!!.
फक्त खडू आणि फळा
घेऊ द्या हो जरा हाती
मग बघा फुलतील
समईतील रे वाती...!!
गुरू शिष्याचे हे नाते
आहेच जगावेगळे
गुणवत्ता वाढवूया
बोले शिक्षक सगळे....!!
मिनू म्हणे आता जरा
पाळा सर्वांनीच शिस्त
शिकवा ना लेकरांना
ना कुणाचीच भिस्त....!!
ठेवा मायेचा ओलावा
त्या खुर्चिला विचारा
तुमच्या हाती भविष्य
वाट पाहतो बिचारा....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
वाशिम
Comments
Post a Comment